विद्याचा ‘जान’लेवा लूक – ‘बेगम जान’

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्या बालन यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली फिल्म ‘बेगम जान’ चे पोस्टर झळकले असून या पोस्टरच्या पहिल्याच लूकमध्ये विद्या बेगमची ‘जान’लेवा अदाकारी बाजी मारून गेली आहे. ही फिल्म श्रीजीत मुखर्जी यांनी दिग्दर्शित केली आहे. यात विद्या एका देहविक्रय करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचे निर्माते महेश आणि मुकेश भट्ट आहेत. विद्या बालन यांच्या सोबत गौहर खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘ द डर्टी पिक्चर’ नंतर विद्याचा हा दुसरा बोल्ड आणि बिनधास्त चित्रपट आहे. विद्याच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग आहे. ‘बेगम जान’ची तो आवर्जून वाट पाहात आहे.

बंगाली चित्रपट ‘राजकाहिनी’चा हा हिंदी रिमेक आहे. ‘राजकाहिनी’ या चित्रपटाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाला होता. चित्रपटाची पार्श्वभूमी १९४७ नंतर झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान विभाजनानंतरच्या बंगाल प्रांतातील आहे. चित्रपटाची कथा एकाच घरात राहून वारांगनांचे जीवन जगणाऱ्या ११ महिलांची आहे. विद्या बालन या घराची मालकीण दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या