कमांडो स्टाईलने ‘या’ अभिनेत्याने प्रेयसीला घातली लग्नाची मागणी!

आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमभावना व्यक्त करणं असो किंवा लग्नाची मागणी घालणं, अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवतात. जेणेकरून त्यांचा तो क्षण कायम लक्षात राहावा. अशीच एक आयडियाची कल्पना लढवून एका अभिनेत्याने त्याच्या प्रेयसीला घातलेली लग्नाची मागणी चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे.

या अभिनेत्याचं नाव विद्युत जामवाल असं आहे. विद्युतने नुकतीच त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. विद्युतच्या प्रेयसीचं नाव नंदिता महतानी असं आहे. नंदिता ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून तिचं बॉलिवूडसोबत एक खास कनेक्शन आहे.

नंदिताची प्ले ग्राऊंड नावाची एक कंपनी असून त्यात अभिनेता डिनो मोरिया याची भागिदारी आहे. ती विराट कोहलीचीही स्टायलिस्ट म्हणून काम करते. विराटखेरीज अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्टाईल्सचं डिझायनिंग ती करते.

विद्युत आणि तिचं नातं गेल्या काही काळापासून चर्चेत होतं. आता विद्युतने अनोख्या पद्धतीने तिला लग्नाची मागणी घातली आहे. विद्युत नंदितासोबत नुकताच आग्र्यातील सैन्य तळावर पोहोचला होता. त्या दोघांनी रॅपलिंग करत 150 मीटर उंच भिंत उतरण्याचा निर्णय घेतला.

vidyut-jammwal-nandita

भिंतीवर उभे असतानाच विद्युतने नंदिताला लग्नाची मागणी घातली. तिने हो म्हणताच त्याने तिच्या बोटात अंगठी घातली. त्यानंतर त्यांनी ताजमहालाला भेट दिली आणि आपलं नातं जगजाहीर केलं.

आपली प्रतिक्रिया द्या