12 व्या मजल्यावरून पडली, डिलिव्हरी बॉयने झेलली; अंगावर काटा येणारा व्हिडीओ व्हायरल

व्हिएतनाममधील हनोई शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. व्हिडीओमध्ये 12 व्या मजल्यावरून एक चिमुकली पडते आणि खाली एक डिलिव्हरी बॉय तिला अलगद झेलतो, असे दिसते.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्गुयेन नागॉस मान्ह नावाचा 31 वर्षीय डिलिव्हरी बॉय कारमध्ये बसून डिलिव्हरी स्वीकारणाऱ्याची वाट पाहात होता. याचवेळी त्याने एका चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकला. न्गुयेनला एक महिला इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील खिडकीत ओरडताना दिसली. सुरुवातीला न्गुयेनला चिमुकली खेळत असेल असे वाटले, मात्र ही चिमुकली खेळत नसून बाल्कनीमध्ये लटकल्याचे न्गुयेन याच्या ध्यानात आले.

काहीतरी अघटीत घडणार असे जाणवताच न्गुयेन कारमधून वेगाने बाहेर पडला आणि चिमुकली ज्या बाल्कनीमध्ये लटकत होती त्याच्या खाली येऊन उभा राहिला. यानंतर त्याने चिमुकलीजवळ पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. न्गुयेन जनरेटरच्या छतावर चढला, यावेळी तो धडपडलाही. मात्र चिमुकली खाली पडताना दिसताच त्याने स्वत:ला झोकून दिले आणि चिमुकलीचा जीव वाचवला.

दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. न्गुयेन याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या