सेक्स पॉवर वाढवणाऱ्या व्हायग्राच्या गोळ्या हृदयविकारावर लाभदायी, संशोधकांचा दावा

सामना ऑनलाईन । मँचेस्टर
सेक्स पॉवर वाढवणाऱ्या व्हायग्राच्या गोळ्या हृदयविकारावरही लाभदायी आहेत, असा दावा मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. या गोळ्या पुरुषांची सेक्स पॉवरच वाढवत नाहीत तर त्यांना भविष्यात होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यापासूनही वाचवू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
शास्त्रज्ञ अँण्ड्रयू टॅफर्ड यांनी डेली एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्हायग्राच्या गोळ्यांबाबत केलेल्या संशोधनाची माहिती दिली.
टॅफर्ड आणि त्यांच्या टीमने व्हायग्रा तसेच हृदयविकार यांच्यातील संबंधांवर नुकतेच एक संशोधन केले. यासाठी तब्बल ६००० मधुमेहींवर प्रयोग करण्यात आला. या सगळ्या रुग्णांना व्हायग्राच्या गोळ्या नियमित देण्यात आल्या होत्या. व्हायग्रा खाल्यानंतर या रुग्णांच्या हृदयविकाराच्या समस्या हळूहळू कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या