उद्धव ठाकरेंचं अभिनंदन टाळण्यासाठी भाजपचा ड्रामा, उपमहापौर देणार राजीनामा

2204
vijay-autade-aurangabad

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संभाजीनगर महापालिकेत मांडण्यात आल्यानंतर भाजपने केवळ अभिनंदनाचा ठराव टाळण्यासाठी उपमहापौर पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. संभाजीनगर पालिकेत देखील युती तुटल्याचे भाजपच्या उपमहापौर विजय औताडे यांनी एकतर्फीच जाहीर केले.

संभाजीनगर महापालिकेची शुक्रवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव राजेंद्र हिरे आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी हा ठराव मांडला. मात्र भाजपला उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव पचनी पडला नाही. म्हणून भाजपचे उपमहापौर त्यांच्या नियोजित खूर्चीवर न बसता सभागृहातील सदस्यांच्या खूर्चीत बसले.

यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, ‘राज्यात आणि देशात शिवसेना-भाजपची यूती नसताना तुम्ही संभाजीनगर महापालिकेत एकत्र कसे असा सवाल लोक विचारत आहे. आता आम्ही शिवसेनेसोबत नाही. म्हणून मी काही वेळातच राजीनामा देणार आहे’, असे विजय औताडे यांनी सांगितले.

दरम्यान, संभाजीनगरात शिवसेना-भाजप अशी 30 वर्षांपासूनची युती आहे. ही युती तुटल्याची घोषणा आज भाजपच्या औताडे यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आता महापालिकेतील आकड्यांचे गणित कसे असेल याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या