पृथ्वीचे द्विशतकी तुफान, फिरकीवीर सोळंकीच्या माऱयापुढे पुद्दुचेरी सपाट

ऑस्ट्रेलियन दौरा आणि आयपीएलमधील अपयश पार धुऊन टाकणारी कामगिरी मुंबईचा धडाकेबाज युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरी धडाकेबाज खेळी आज दुबळय़ा पुद्दुचेरीविरुद्ध साकारली. पृथ्वीने पुद्दुचेरीविरुद्धच्या सामन्यात प्रथम 65 चेंडूंत शतक त्यानंतर 142 चेंडूंत द्विशतक झळकावले. या स्पर्धेतील पृथ्वीची ही दुसरी धडाकेबाज खेळी आहे. याआधी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने 89 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या महाराष्ट्रविरुद्धच्या लढतीत त्याने 34 धावा केल्या. पृथ्वी आणि सूर्यपुमारच्या शतकी खेळीनंतर मुंबईकर लेगस्पिनर प्रशांत सोळंकीने 48 धावांत 5 फलंदाज बाद करीत मुंबईला पुद्दुचेरीवर 233 धावांचा महाविजय मिळवून दिला.

जयपूरमध्ये सुरू असलेल्या सामन्यात पुड्डुचेरीने नाणेफेक जिंपून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पृथ्वी पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांवर तुटून पडला. पृथ्वीच्या स्पह्टक खेळीत सहभागी झाला तो मुंबईचा आणखी एक धडाकेबाज फलंदाज सूर्यपुमार यादव, त्याने फक्त 58 चेंडूंत 133 धावा केल्या. या दोघांच्या तुफानी खेळीने मुंबईने 50 षटकांत 4 बाद 457 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत या सामन्यात पृथ्वी मुंबईचे नेतृत्व करीत आहे. त्याने 152 चेंडूंत 31 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 227 धावा केल्या. पृथ्वी 50 षटकांच्या लढतीत द्विशतक झळकावणारा आठवा हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. विजय हजारे स्पर्धेच्या इतिहासातील हे चौथे द्विशतक ठरले आहे.

पृथ्वीचा अपयशाला बायबाय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पृथ्वीने दमदार सुरुवात केली होती. त्याने पहिल्याच कसोटीत शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. डोपिंग चाचणीत फेल झाल्याने त्याच्यावर काही महिन्यांची बंदी घातली गेली होती. पण त्यानंतर पृथ्वीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. पण आता देशांतर्गत विजय हजारे करंडक मर्यादित षटकांच्या स्पर्धेत पृथ्वीची बॅट पुन्हा तेजाने तळपत आहे. महाराष्ट्र संघाविरुद्ध आपले हात आजमावायला न मिळालेल्या पृथ्वीने पुढच्या दोन्ही लढतींत आपल्या बॅटचे पाणी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पाजले. त्याच्या शतकी खेळींमुळे मुंबईला सलग दोन मोठे विजय मिळवता आले आहेत. या स्पर्धेतील ‘ड’ गटात 3 विजयांसह 12 गुण मिळवत मुंबई टॉपच्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक
मुंबई ः 50 षटकांत 4 बाद 457 (पृथ्वी शॉ नाबाद 227, सूर्यपुमार यादव 133, आदित्य तारे 56 ः पंकज सिंग 59 धावांत 2 विकेट ) विजयी वि. पुद्दुचेरी 38.1 षटकांत सर्वबाद 224 ः प्रशांत सोळंकी 48 धावांत 5 विकेट, शार्दुल ठापूर 31 धावांत 2 विकेट, तुषार देशपांडे 53 धावांत 2 विकेट).

आपली प्रतिक्रिया द्या