हिंदुस्थानी बँकांनी मल्ल्याला पुन्हा ब्रिटिश कोर्टात खेचले

281

कर्जबुडव्या विजय मल्ल्या याला दिवाळखोर घोषित करा अशी मागणी करत स्टेट बँक ऑफ इंडियासहित आणखी 13 बँकांनी मल्ल्याला पुन्हा ब्रिटिश कोर्टात खेचले आहे. तब्बल 1.52 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडले नसल्याचा त्याच्यावर आरोप आहे. लंडनच्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मायकल ब्रिज यांनी मल्ल्याबाबतच्या प्रकरणाची सुनावणी याच आठवडय़ात केली आहे.

मल्ल्या याने कर्जाची परतफेड केली नसल्याने येथे बँकांनी 2018 साली दाखल केलेल्या काही याचिकांच्या संदर्भात सुनावणी होत आहे. यानंतर बँकांनी ब्रिटनमधील मल्ल्याची संपत्ती जप्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. आता त्याला दिवाळखोर घोषित करून घेण्यासाठी या बँकांनी पुन्हा एकदा ब्रिटिश न्यायालयात धाव घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या