मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांच्या मालमत्ता जप्त होणार

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हजारो कोटींचे बँकेचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार होण्याच्या गुह्यांना लगाम घालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने फरारी आर्थिक गुन्हेगार वटहुकूम (२०१८) ला मंजुरी दिली. या वटहुकुमामुळे फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारख्या घोटाळेबाजांची मालमत्ता त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल लागण्याआधीच जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे.

त्यामुळे जप्त मालमत्ता विकून बँकांच्या कर्जाची वसुली करणे शक्य होणार आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार वटहुकुमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा वटहुकूम अमलात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या