जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

927

शिवसेना नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रूग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन वर्षांपूर्वीसुद्धा त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी योग्य ते उपचार त्यांनी करवून घेतले होते. शिवतारे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.

ईसीजी चाचणीत त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर डॉ. नितीन गोखले, डॉ. देवेन मेहता, डॉ. मॅथ्यूज उपचार करीत आहेत. बुधवारी त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आपली प्रतिक्रिया द्या