जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे लीलावतीत

891

जलसंपदा-जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ईसीजी चाचणीत त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर डॉ. नितीन गोखले, डॉ. देवेन मेहता, डॉ. मॅथ्यूज हे उपचार करीत आहेत. बुधवारी त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतारे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आपली प्रतिक्रिया द्या