राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी – विजय वडेट्टीवार

राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. हाथरस प्रकरणाती पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राहुल गांधींना घाबरले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पीडित परिवाराची भेट घेणे आमचा अधिकार असल्याचे मत त्यानी मांडले.

गुरुवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासरचिटणीस प्रियंका गांधी हे दिल्लीहून हाथरस येथे रवाना झाले. पीडित परिवाराला भेटून त्यांची विचारपूस आणि सांत्वन करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र, एक्सप्रेस वे वर राहुल-प्रियंका यांच्या गाड्यांचा ताफा रोखण्यात आला. त्यानंतर दोघांनी पायी जाण्याचे ठरवले असता त्यांना रोखण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुकी झाली आणि कलम 188 च्या नुसार त्यांना अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या