गाडी उलटवली, सरकार वाचवले; अखिलेश यांचा आरोप

1150

उत्तर प्रदेशमधील कानपुर येथे 8 पोलिसांच्या हत्येतील आरोपी विकास दुबे शुक्रवारी पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीएफने जेव्हा त्याला मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून कानपूर येथे आणले तेव्हा वाटेतच गाडी अपघातग्रस्त होऊन उलटली. याच दरम्यान विकास दुबे याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला आणि प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारला लक्ष्य केलं आहे. अखिलेश ट्विट करत म्हणाले आहे की, ‘कार नाही उलटली, सरकार उलटण्यापासून वाचले.’ असं ते म्हणाले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील पत्रकार परिषदेत योगी सरकारवर हल्लाबोल केला. योगी सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी फोफावली गेल्याचे त्यांनी म्हटले. तसेच 11 सवालही उपस्थित केले आहेत.

विकास दुबे एन्काऊंटरवर काँग्रेसचे योगी सरकारला 11 सवाल; अखिलेश म्हणतात, ‘…तर सरकार पडले असते’

आपली प्रतिक्रिया द्या