विकास दुबे एन्काऊंटरवर चित्रपटाची घोषणा; ‘या’ अभिनेत्याला ऑफर, पण…

2093

कानपुर पोलीस हत्याकांडमधील आरोपी विकास दुबे याचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. विकास दुबे याच्या एन्काऊंटरमुळे राजकारण तापलेले असले तरी बॉलिवूडला मात्र नवी स्क्रिप्ट मिळाली आहे. प्रोड्युसर संदीप कुमार यांनी यावर चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव त्यांनी उघड केले नसले तरी 10 ते 15 कोटींचे बजेट असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘जुगाड़’ आणि ‘अनारकली ऑफ आरा’ यासारख्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या संदीप यांनी ‘दै. भास्कर’शी बोलताना या चित्रपटाची घोषणा केली.

विकास दुबे याच्या एन्काऊंटरनंतर यावर चित्रपट तयार करण्याचे ठरवले आणि याबाबत अभिनेता मनोज वाजपेयी यांच्याशी चर्चा झाल्याचे संदीप यांनी सांगितले. अद्याप त्यांनी होकार दिलेला नाही, मात्र यावर चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले. तसेच या टॉपिकवर अन्य कोणी चित्रपटाची घोषणा करण्याची भीती होती, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विकास दुबे याच्या भूमिकेसाठी मनोज वाजपेयी यांचे नाव चर्चेत होते. मात्र आपण विकास दुबेची भुमिका करणार नाही असे मनोज वाजपेयीने जाहीर करून हे वृत्त फेटाळले आहे.

manoj-vajpayee

आता दिग्दर्शक शोधावा लागेल. मात्र आशा आहे की एखादा मोठा प्रोड्युसर यावर चित्रपटाची घोषणा करणार नाही. मी छोटा प्रोड्युसर आहे, असेही संदीप म्हणाले. तसेच  स्टोरीवर काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. तसेच सध्या चित्रपटाच्या नावावर चर्चा करणे घाई करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. तीन-चार नावं डोक्यात असून उद्या ते रजिस्टर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या