8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचे भाजप मंत्र्यासोबतचे फोटो व्हायरल

2420

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ चकमकीमध्ये पोलीस उप अधीक्षकासह 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. या पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या विकास दुबे या कुख्यात गुंडाचे भाजपच्या मंत्र्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो उत्तर प्रदेशच्याच एका माजी सनदी अधिकाऱ्याने व्हायरल केले आहेत हे विशेष. सूर्यप्रताप सिंह असं या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने विकास दुबे आणि भाजप मंत्र्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

विकास दुबे याच्यासोबत फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही ब्रजेश पाठक असून ते उत्तर प्रदेशातील कायदामंत्री आहेत. शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर दुबे फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 20 पथके तयार केली आहेत. दुबे याच्यावर 50 हजार रुपयांचे इनाम असून युद्धपातळीवर त्याच्या शोध घेण्याचे काम सुरू आहे.

kanpur-encounter-police

पोलिसांना संशय आहे की दुबे याचे पोलीस ठाण्यामध्ये खबरी होते. चौबेपूर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल तपासण्यात आले असून त्यामध्ये दुबेशी संभाषण झाल्याचे काही पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

uttar-pradesh-police3 जुलै रोजी उत्तरप्रदेशात नामचिन गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अंधाधुद गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक, तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. भयंकर चकमकीत आठ पोलीस कर्मचारी शहीद झाल्याने देशभरात खळबळ उडाली असून, उत्तरप्रदेशातील कायदा-सुयवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

girl-crying-funeral-kanpur

खून, अपहरण, दरोडा, खुनाची सुपारीसह तब्बल 60 गंभीर गुन्हे असलेला गुंड विकास दुबे पोलिसांच्या हिटलिस्टवर होता. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. विकास दुबे हा कानपूरनजीकच्या बिकरू गावात असल्याची माहिती पोलिसांना गुरूवारी रात्री मिळाली. पोलीस उपअधिक्षक देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक मध्यरात्री बिकरू गावात पोहचले आणि भयंकर घटना घडली.

kanpur-encounter-site

रस्ता अडवला; घराच्या टेरेसवरून गोळीबार
पोलिसांचे पथक गावात येणार याची खबर आधीच दुबे गँगला मिळाली होती. जेसीबीने रस्ता उखडून टाकला होता. त्यामुळे पोलिसांची गाडी विकास दुबेपर्यंत पोहचू शकली नाही आणि भयंकर घटना घडली. दुबेचे गुंड घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते.

forensic-team-kanpur-encoun

पोलीस पथकावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. उपअधिक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह उपनिरीक्षक महेश चंद्र यादव, अनुपकुमार सिंह, निबूलाल आणि कॉन्स्टेबल जितेंद्र पाल, सुलतान सिंह, बबलू कुमार आणि राहुल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. दोन उपनिरीक्षक, तीन कॉन्स्टेबल, एक होमगार्ड आणि एक नागरिक जखमी झाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या