विक्रोळीच्या सहाय्यक निरीक्षकाचा अतिताणाने मृत्यू

43

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई पोलीस दलातील आणखी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिताणाचा बळी ठरला. विक्रोळी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे (३०) हे काम करता करता खुर्चीतच कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विक्रोळी पोलीस ठाण्यातील ऑफिसर रूममध्ये सहायक पोलीस निरीक्षक सागर खरे खुर्चीवर बसले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राणे हे ऑफिसर रूममध्ये गेले त्यावेळी खरे हे खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी ही माहिती पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱयांना कळविली. खरे यांना तत्काळ उपचारासाठी मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. खरे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या