विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ प्रदर्शनास सज्ज

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी अभिनय केलेला ‘सूर लागू दे’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

‘सूर लागू दे’च्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचे कथानकही काहीशा वेगळय़ा पठडीतील आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार तसेच अभिनेत्री रिना अगरवाल ‘सूर लागू दे’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. ऑडबॉल मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण बिरजे यांचे आहे.