विले पार्लेच्या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सुरू करा, शिवसेनेची मागणी

577
file photo

विले पार्लेत सहार रोड येथील पारशीवाडा हिंदू स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात गैरसोय होत आहे. त्यामुळे ही विद्युतदाहिनी तातडीने दुरुस्त करून सुरू करावी अशी मागणी शिवसेना विले पार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी सहायक आयुक्त आणि प्रभाग समिती अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रभाव वाढला असताना विद्युतदाहिनी बंद असल्याने मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. अंधेरी, विलेपार्लेतील मृतदेह दहन करण्यासाठी के-पश्चिममधील ओशिवरा येथे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत न्यावे लागत आहेत. इतक्या दूरवर नेल्यामुळे नातेवाईकांना सात ते आठ तास मृतदेहासोबत ताटकळत रहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विले पार्ले समन्वयक नितीन डिचोलकर यांनी के-पूर्वच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे. विद्युुतदाहिनीचे काम वेगाने करावे असेही निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या