रत्नागिरीत चाकरमान्यांसह गावकऱ्यांनी खोदली विहिर, लॉकडाऊनमधील वेळेचा केला सदुपयोग

793

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत चाकरमानी आणि ग्रामस्थांनी मिळून विहीर खोदली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड गावातील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी गावात 40 फूट खोल विहीर खणली आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून गावच्या पाणी प्रश्नावर मात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गावी चाकरमान्यांना सोबत घेत ग्रामस्थांनी खोदलेल्या विहिरीला लॉकडाऊन विहिर असे नाव दिले आहे.

lock-down-well

भायजेवाडीत 10 कुटुंबे रहातात. गावात पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन ग्रामस्थांनी विहिर खोदण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या कालावधीत 40 फूट विहीर खोदत गावात पाण्याचा नवा स्त्रोत निर्माण केला. महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. मुंबईहून आलेले चाकरमानी आणि गावातील तरूणांनी तीन महिने श्रमदान करून विहिर खोदली. विहिरीला पाणी लागताच तरूणांची मेहनत फळाला आली. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जि प सदस्य परशुराम कदम व पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच संतोष गुरव, उपसरपंच मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत या विहिरीचे पूजन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या