शेरवली टेटवली गावांना जोडणाऱ्या रस्त्याची चाळण, गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची ग्रामस्थांची मागणी

खेड तालुक्यातील शेरवली संगलट आणि दापोली तालूक्यातील टेटवली वाकवली गावांना जोडणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

खेड तालूक्यातील शेरवली, संगलट, कोरेगाव आणि दापोली तालुक्यातील टेटवली, वाकवली दापोलीला जोडणाऱ्या व वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा रस्त्यावर टेटवली हद्दीत ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दापोली तालूक्यातील टेटवली हद्दीतून पुढे रूखी मार्गे वाकवली तसेच टेटवलीतून गावतळेकडे येण्यासाठी रस्ता खुपच खराब झाला आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णतः उखडून गेले असून रस्त्यात पडलेले खड्डे हे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात यावेत अशाप्रकारची टेटवली शेरवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या