बीडमध्ये मेटेंचा शिवसंग्राम ‘महायुती’सोबतच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

1285

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष संघटना भाजपा-शिवसेना-रिपाई पक्षांसह महायुतीमध्ये सहभागी आहे. जागा वाटपामध्ये शिवसंग्रामला महायुतीतील घटक पक्ष म्हणून तीन जागा दिल्या आहेत. महायुतीच्या सर्व प्रमुखांनी ठरविल्याप्रमाणे सहभागी सर्व पक्ष इमाने इतबारे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना साथ देणार आहेत. बीडमध्ये सर्वच ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला शिवसंग्राम साथ देणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम भवन येथे पार पडलेल्या बैठकीत शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी जाहीर केले.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढवळे, सुहास पाटील, अनिल घुमरे, अ‍ॅड.राहुल मस्के, नारायण काशिद, सुभाष सपकाळ, बाळासाहेब जटाळ, बबन माने, मिराताई डावकर, शितल पिंगळे, राहुल बनगर, नवनाथ प्रभाळे, सुधीर काकडे, अजय सुरवसे, मनोज जाधव आदी उपस्थित होते.

शिवसंग्राम भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये सध्या भाजपा-शिवसेना महायुतीची घौडदौड चालू आहे. राज्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे हे राज्यामध्ये महायुतीचा प्रचार करत आहेत. यामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचींही जबाबदारी आहे की, बीड मधील उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी यासाठी कामाला लागायचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या