कर्जमाफी हवी, टोल भरायचा नाही… लोकांना सगळं फुकट पाहिजे

62

सामना प्रतिनिधी । कल्याण

साले म्हणून शेतकऱयांचा अपमान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची जीभ घसरली. शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी, लोकांना टोलही भरायला नको… सगळंच सगळ्यांना फुकट पाहिजे! हे आणायचं कुठून? राजकारण्यांना फुकट द्यायला आवडतं आणि जेवढं फुकट मिळतं तेवढं पदरात पाडून घेण्याचा जनतेचा मूड असतोच अशी मल्लीनाथी तावडे यांनी आज कल्याण येथे केली.

कल्याण पश्चिम येथे एका कार्यक्रमात बोलताना तावडे म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाचे, उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर त्याच्या देखभालीच्या खर्चाबाबत मला नेहमी प्रश्न पडतो की याचे पुढे कसे होणार. इतकंच काय शेतकरी २२ हजार कोटींची कर्जमाफी मागतात, पण सगळं फुकट आणायचं कुठून? पण आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायला आवडतं, मग काय देतो फुकट. आणि लोकंही जेवढं फुकट मिळेल तेवढं बरं अशाच मूडमध्ये असतात.

आपली प्रतिक्रिया द्या