गुजरातमध्ये हिंसाचार; पोलिसांनी फोडल्या अश्रूधूराच्या नळकांड्या

48

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्हय़ातील गुंदरन या गावात सिद्दी समाज आणि गावकरी यांच्यात दोन दिवसांपासून हिंसक संघर्षाचा भडका उडाला आहे. जमावाला काबूत आणण्यासाठी आज पोलिसांनी अश्रूधुरांची ३० नळकांडी फोडतानाच हवेत पाच फैरी झाडल्या. पोलीस आणि दोन गटांच्या संघर्षात दोन पोलिसांसह १४ जण जखमी झाले आहेत.

मधुपूर आणि झम्बूर या गावातील सिद्दी समाजाच्या लोकांनी काही वाहनांची जाळपोळ करीत रास्ता रोको केले. त्यानंतर मधुपूर येथील गावकऱयांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची जाळपोळ केली. सिद्दी समाज हा पाच शतकांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरीत होऊन तिथे वसलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या