विरल आचार्य यांचा रिझर्व्ह बँकेला रामराम

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या महिन्यात आश्चर्यकारकरीत्या रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदाचा राजीनामा देणारे विरल आचार्य यांनी आज बँकेला अखेरचा रामराम केला. बँकेत आज त्यांचा शेवटचा दिवस होता. 45 वर्षीय आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेस येथे शिकवणार आहेत.

ते सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर आणि बँकेच्या आर्थिक धोरण विभागाचे प्रमुखही होते. मूळचे मुंबईकर असलेले आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम राहावी यावर नेहमीच जोर दिला होता. सरकारने देशातील प्रमुख बँकेच्या स्वातंत्र्याचा आदर केला नाही तर आर्थिक बाजारपेठेत बँकेची पत घसरेल असा इशाराही त्यांनी दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या