सर्पमित्राची फेसबुकवर लाईव्ह आत्महत्या, व्हिडिओ व्हायरल

159

सामना ऑनलाईन । सेंट पिटर्सबर्ग

रशियामधील एका सर्पमित्राने लाईव्ह आत्महत्या केली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अस्लार्न वालेव्ह असे आत्महत्या केलेल्या सर्पमित्राचे नाव आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याने घरामध्ये पाळलेल्या ब्लॅक मांबा या जगातील विषारी सापाकडून स्वत:च्या बोटांना चावून घेतले. लग्न मोडल्यामुळे वालेव्हने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र यामागील निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सर्पमित्र अस्लार्न वालेव्ह (३१) हा रशियातील सेंट पिटर्सबर्गमधील रहिवासी होता. लग्न मोडल्यामुळे तणावाखाली असलेल्या वालेव्हने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वालेव्हने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग केलेला सात मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वालेव्ह एका खुर्चीवर बसलेला दिसतो आणि काही वेळानंतर उठून जाताना दिसतो. परत आल्यानंतर वालेव्ह कॅमेरासमोर ब्लॅक मांबाकडून चावून घेतलेला हात दाखवतो आणि आत्महत्या का केली हे जाणून घेण्यासाठी आपल्या माजी पत्नीशी संपर्क साधा असे सांगतो. व्हिडिओमध्ये वालेव्ह सापाकडून चावून घेताना दाखवले नाही. मात्र त्याच्या बोटावर साप चावल्याची खूण स्पष्ट दिसत आहे.

russia-sui

व्हिडिओमध्ये वालेव्ह तणावाखाली दिसत आहे आणि ‘ते करण्याची वेळ आली आहे’, असे म्हणून तो खुर्चीवरून उठून जातो. त्यानंतर खुर्चीवर पुन्हा बसत वालेव्ह ‘मी मरत आहे तर मला मरू द्या. मी काही क्षणांसाठीच तुमच्यासोबत आहे, असे म्हणतो आणि उठून बाथरूमकडे चालत जातो. काही वेळानंतर त्याचा मृत्यू होतो. वालेव्ह आणि त्याच्या पत्नीमध्ये ४ ऑगस्टला भांडण झाल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यावेळी वालेव्हने पत्नीला मारहाणही केली होती. यात त्याच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काही दिवसांनंतर त्याने माफी मागितली मात्र त्याच्या पत्नीने लग्न मोडले, असे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या