वय वर्ष ३०, पण दिसतो २ वर्षांच्या मुलासारखा

31

सामना ऑनलाईन । बीजिंग

वय वाढत जाते तसे मानसाचे शरीरामध्येही वाढ होत असते. हा निसर्गाचा नियम आहे. मात्र चीनमधील एका ३० वर्षीय चिमुरड्याला हा नियम लागू होतो. ३० वर्षीय चिमुरडा? बुचकळ्यात पडलात ना. हो हे खरे आहे कारण तो २ वर्षांच्या मुलासारखा दिसत असला तरी त्याचे वय मात्र ३० आहे.

चीनच्या पूर्वेकडील भागामध्ये असणाऱ्या गावात जन्मलेल्या वांग तियानफांग याला एक रहस्यमय आजार आहे. वांग याचा जन्म १९८७मध्ये झाला होता, मात्र जन्माच्या २ वर्षानंतर त्याची वाढ खुंटली. वांग सध्या ३० वर्षांचा आहे, मात्र त्याचे शरीर एखाद्या २ वर्षांच्या मुलासारखे आहे. वांगची उंची २ फुट ७ इंच आहे. वांगचे शरीरच नाही तर त्याचा मेंदूचाही विकास झालेला नाही. एवढेच नाही तर वांगला बोलण्याचीही समस्या आहे.

वांगच्या अशा स्थितीबाबत बोलताना त्याची आईने सांगितले की, वांगची शारिरीक वाढ खुंटली तेव्हा लोकांनी त्याला रस्त्यावर किंवा एखाद्या मंदिरामध्ये सोडून देण्याचा सल्ला दिला होता. मात्र एक आई आपल्या मुलाचा कोणत्याही परिस्थितीत सांभाळ करण्यास सक्षम असल्याचे दाखवून देण्यासाठी मी तसे केली नाही, असे वांगची आई म्हणाली. वांगला जेवण भरवण्यासह त्याला या वयातही कपडे घालण्याचे काम त्याच्या आईला करावे लागले. मुलाचा सांभाळ करण्यासाठी वांगच्या आईला नोकरीही सोडावी लागली. सध्या ती एका चहाच्या मळ्यामध्ये काम करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या