बापरे! महिलेने लिलया पकडला ९ फुटी अजगर, व्हिडिओ व्हायरल

77

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

साप पकडने ही एक कला आहे. समोर साप दिसता तरी अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र फ्लोरिडामधील महिलेने रस्त्याच्या कडेला झाडीमध्ये लपून बसलेल्या ९ फुटी अजगराला लिलया पकडले. एका लाकडाच्या सहाय्याने महिला अजगराला पकडते. या धाडसी महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ फ्लोरिडामधील लिऑन काउंटी शेरिफ ऑफिस या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिमधील महिलेचे नाव एमिली असे असून, ती एक गुप्तहेर आहे. एमिलीने एका लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने अजगराला पकडण्यास सुरुवात केली तेव्हा अजगर तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अखेर त्याचा एका बॅगेमध्ये बंद करण्यात तिला यश येते. एमिली साप पकडण्यामधील एक्स्पर्ट आहे.

पाहा व्हिडिओ :

आपली प्रतिक्रिया द्या