आपल्या मालकाला भेटण्यासाठी कुत्र्याने २० मैल अंतर केले पार

73

सामना ऑनलाईन । ओक्लहोमा

माणसाने इमानदारीची व्याख्या कुत्र्याशी जोडली आहे आणि ते खरेही आहे. सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी लवकर माणसांमध्ये मिसळतो. पाळीव कुत्रा आपल्या मालकासाठी काहीही करू शकतो. याचेच उदाहरण अमेरिकेच्या ओक्लहोमा शहरात पाहायला मिळाले. जहां कॅथलीन नावाच्या एका कुत्र्याने आपल्या मालकाला भेटण्यासाठी दोन वेळा २० मैल अंतर पार केले आहे.

अमेरिकेतील ओक्लहोमा येथे राहणारा कॅथलिनचा मालक आपले जुने घर सोडून नवीन घरी राहायला गेला. मालक जास्त वयस्कर असल्यामुळे कॅथलिनची काळजी कोण घेणार असा प्रश्न सतावत होता. त्यामुळे मालकाने कॅथलिनला तिथेच राहणाऱ्या परिवाराकडे सोपवले. त्यानंतर ते आपल्या जुन्या घरापासून २० मैल दूर असलेल्या नवीन घरी राहायला गेले.

कॅथलिनच्या नवीन मालकिणीने सांगितले की, ‘कॅथलिनला माझ्याकडे राहायला फारसे आवडत नाही. ती फार हुशार असून तिने २० मैल दूर असलेल्या आपल्या जुन्या घराचा रस्ता शोधून काढला. मला तिच्या या वागण्याचे कौतुक वाटले नाही आणि आश्चर्यही वाटले नाही.’ कॅथलिनच्या वारंवार घरातून गायब होण्यामुळे तिच्या नवीन मालकीणीला वाटायचे की, कॅथलिनला तिचे घर आवडत नसावे. याबाबत प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी पोस्ट केल्या केल्या ती व्हायरल झाली आणि त्यांना अनेक लोकांचे मेसेज येऊ लागले. सर्वांनी कॅथलिनला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर संस्थेन काही दिवसांपूर्वीच कॅथलीनला टेक्सासच्या एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या