हे जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आहेत का? फोटो व्हायरल

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्द करण्याआधी राज्यात शांतता रहावी यासाठी येथील बड्या नेत्यांना ताब्यात घेऊन नजकैदेत ठेवण्यात आले. राज्यात शांतात कायम ठेवण्यासाठी पब्लिक सेफ्टी अॅक्टच्या अंतर्गत या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. यामध्ये जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यासारख्या बड्या नेत्यांना नजरकैदे ठेवण्यात आले होते. अशातच एका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही ओमर अब्दुल्ला सारखी दिसत आहे. मात्र ही व्यक्ती ओमर अब्दुल्ला आहे का? अशी मोठी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मागील दोन महिन्यांपासून नजरकैदेत असल्याने ओमर अब्दुल्ला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाही आहे. हा फोटो नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती एक आकाशी रंगाच्या कुर्ता आणि वाढलेल्या दाढीमध्ये दिसत आहे. अर्थात ओमर अब्दुल्ला याआधी अशा लूक मध्ये कधी दिसले नाही. त्यामुळे सर्वांनाच हा फोटो पाहून धक्का बसला आहे. या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती जरी ओमर अब्दुल्ला सारखी दिसत असली, तरी याची पुष्टी अद्याप झालेली नाही आहे.

दरम्यान, जम्मू-कश्मीरच्या विभाजनाचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी मेहबुबा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासह नॅशनल काँग्रेस, काँग्रेस, पीडीपी, माकपा, पीपुल्स कॉन्फरन्स कश्मीरमधील राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते, तर काहींना नजरकैद करण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना 5 ऑगस्टला ताब्यात घेण्यात आले होते. यावरून मोठा राजकीय गोंधळ उडाला होता. तसेच आरोप-प्रत्यारोप झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या