आता माझी सटकली…! नाळ कापण्यापूर्वी नवजात बालिकेने असे काही पाहिले, डॉक्टरांनाही बसला धक्का

2828

सोशल मीडियावर सध्या एका नवजात बालिकेचा फोटो वायरल होत आहे. याचे कारण म्हणजे त्या बालिकेच्या चेहऱयावरचे भाव. हा फोटो ब्राझिलच्या रियो डी जेनेरियोच्या एका हॉस्पिटलमधील आहे. तिथे 13 फेब्रुवारीला एका महिलेने कन्येला जन्म दिला. जेव्हा डॉक्टरांनी तिची काळ कापण्यापूर्वी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. तिला चापटी मारली. तेव्हा तिने डॉक्टरांकडे अशा मुद्रेने पाहिले की क्षणभर डॉक्टरही घाबरले, तिने डॉक्टरांना फुल खुन्नस दिली.

आईच्या गर्भाशयातून बाहेर आल्यावर मूल प्रकाशाला पहिल्यांदाच सामोरे जाताना डोळे उघडत नाही. पण या बालिकेने डॉक्टरांकडे डोळे विस्फारून बघितले. जणू काही तिने नाखुशीच व्यक्त केली. हे सगळं नाळ कापण्यापूर्वी घडले. काळ कापल्यावर मात्र ती मुलगी रडू लागली. याआधी कोणत्याही नवजात बाळाचे असे हावभाव आम्ही बघितलेले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी नवजात बालिकेच्या अनोख्या भावमुद्रा मोबाईल कॅमेऱयात टिपल्या आणि सोशल मीडीयावर शेअर केले. मुलीचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या