या फोटोत चमकणारे डोळे कोणत्या प्राण्याचे आहेत?

wild-animal

अनेक वेळा असे घडते की सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन वन्य प्राणी एकत्र दिसत आहेत आणि अंधारात त्यांचे डोळे खूप चमकत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या फोटोने सर्वांनाच चकित केले असून, फोटो पाहून सगळेच गोंधळले आहेत.

ट्विटरवर फोटो शेअर करताना अधिकारी परवीन कासवानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जंगलाच्या अंधारात चमकणारे डोळे पाहिले का?” व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अंधारात दोन डोळ्यांच्या जोड्या दिसत आहेत, ज्यांच्या प्रकाशाने जंगलाची शोभा वाढत आहे.

या फोटोत चमकणारे डोळे कोणत्या प्राण्याचे आहेत हे तुम्ही सांगू शकता का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

स्वत:च्या पोस्टला उत्तर देताना कासवान यांनीही उत्तर लोकांसोबत शेअर केले आहे. मात्र, सरळ उत्तर देण्याऐवजी त्याने उत्तर देण्यासाठी विल्यम ब्लेकच्या कवितेतील एक ओळ निवडली आहे. तुम्हीही आमच्या सोशल मीडिया हँडलवर याचे उत्तर देऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)