आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटासाठी अनुष्कानेही दिला होता ऑडिशन, पाहा व्हिडीओ

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 1 मे रोजी आपला वाढदिवस साजरा केला. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे तिने आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. याच दरम्यन आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनुष्का ऑडिशन देताना दिसत आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. असं असलं तरी ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. या चित्रपटात करीना कपूर खान फिमेल लीड होती. व्हिडीओमध्ये अनुष्का मुन्ना ‘भाई एमबीबीएस’ चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहे.

दरम्यान, 3 इडियट्स या चित्रपटाची निर्मती राजकुमार हिरानी यांनी केली होती. आमिर व्यतिरिक्त आर माधवन आणि शरमन जोशीही चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होता.

आपली प्रतिक्रिया द्या