Video -ढिंच्यॅक पुजाचं हे नवीन गाणं एकूण तुम्हीही म्हणाल, ‘ये तो मेरा वाला गाना हैं’

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्ध झालेली ढिंच्यॅक पूजा आता पुन्हा एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. आपण आपल्या दैनंदिनी आयुष्यात करत असलेल्या कामांवर तिने हे गाणं बनवलं आहे. ‘रोज-रोज का काम’ असं या गाण्याचे तिने नाव ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्या या नवीन गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.


View this post on Instagram

ROZ Roz Ka Kaam New song out ✌️ Full video on my YouTube channel

A post shared by Dhinchak Pooja (@dhinchakofficial) on

“सुबह उठते हैं हम, ब्रश करते हैं हम,
फिर खाते हैं हम, फिर जाते हैं हम
चाय बनाते हैं हम, उसे पीते हैं हम,
नहाते हैं हम, फिर तैयार होते हैं हम.”

असे या गाण्याचे बोल आहेत. दरम्यान, ढिंच्यॅक पुजाचं हे नवीन गाणं काही प्रेक्षकांना आवडलेलं नसल्याने तिला यावरूनच सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अनेक नेटकरी तिच्या या गाण्याची खिल्ली देखील उडवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या