हिंदुस्थानातील ‘Iron Man’ पाहिला का? 

1807

मार्वल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’चे तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला ‘टोनी स्टार्क’ही नक्कीच माहित असेल. अ‍ॅव्हेंजर्सचा शेवटचा भाग असलेल्या ‘एंडगेम’मध्ये या  लोकप्रिय सुपरहिरोचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळेच ‘Iron Man’ चे अनेक चाहते भावुक झाले होते. ‘Iron Man’ च्या ज्या सुटने अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्याशीच मिळता जुळता सूट एका हिंदुस्थानी नागरिकांनी स्वदेशी बनावटीत तयार केला आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धातूपासून बनवलेल्या ग्रीन सूटमध्ये दिसत आहे. त्याने आपल्या सूटमध्ये बरीच शस्त्रेही बसविली आहेत, ज्याचे बटन दाबताच त्यातून गोळीबार सुरु होतो. हा व्हिडीओ शेअर करताना असं लिहिले आहे की, ‘हा सूट सैनिकांना दहशतवादाविरूद्ध लढायला मदत करू शकतो.’

तथापि, हा सूट स्वदेशी आहे. म्हणून त्यात परफेक्शन दिसून येत नाही. मात्र अनेक नेटकाऱ्यानी या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आयरन मॅनच्या व्यक्तिरेखेतून हा सूट प्रेरित आहे. मात्र बर्‍याच नेटकाऱ्यानी या व्यक्तीला ट्रोल केले आहे. काही नेटकाऱ्यानी असे लिहिले आहे की, या सुटीची तुलना टोनी स्टार्कच्या सूटशी करणे चुकीचे आहे. असो, इतर लोकांनीही या वर काय प्रतिक्रिया दिली आहे वाचा…

आपली प्रतिक्रिया द्या