IPL 2020 : पंतच्या या फटक्यामुळे इशांतचा यॉर्कर फसला, व्हिडीओ व्हायरल

727
delhi-capital

आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होईल. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर दुसरा सामना 20 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होईल. एकीकडे मुंबई इंडियन्स आणि सीएसके मैदानात घाम गाळत आहेत, तर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलही यात मागे नाहीत. दोन्ही संघ मैदानावर जोरदार सराव करीत आहेत. दिल्ली कॅपिटलचा यष्टिरक्षक आणि स्टार खेळाडू ऋषभ पंतही सराव करत आहे. त्याने सरावावेळी खास अंदाजात फलंदाजी करत दमदार फटकेही खेळले. तो क्रॉस बॅट शॉट्स खेळण्याचा सराव करताना दिसला.


View this post on Instagram

‘ ➡️ Chapter 1️⃣ #Dream11IPL #YehHaiNayiDilli @thesevensstadium

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals) on

इशांत शर्माच्या चेंडूवर ऋषभ पंतने बॅट शेवटच्या क्षणी पलटी करून एक शॉट लगावला. पंतच्या फटक्यामुळे इशांत थोडा चक्रावलाच. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये असं दिसतं की, दिल्ली कॅपिटल सराव करत आहे. इशांत शर्मा गोलंदाजी करत होता आणि पंत फलंदाजी करत होता. इशांत शर्माने त्याला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पंत अडखळेल असा त्याचा अंदाज असावा. पण पंतने बॅट उलटी घुमवली तो चेंडू सीमापार केला. त्यामुळे इशांत शर्माचा अंदाज चुकीचा ठरला. तो त्याचा शॉट पाहतच राहिला.

आपली प्रतिक्रिया द्या