देव तारी त्याला कोण मारी, विचित्र अपघातात बचावले दुचाकीस्वाराचे प्राण; पाहा व्हिडीओ

2492

नियंत्रण सुटलेल्या जेसीबीला महिंद्रा बोलेरोने धडक दिल्याने चमत्कारिकरित्या एका दुचाकीस्वाराचे प्राण वाचले आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तारखेनुसार ही घटना शनिवारी घडली आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभा असलेला दिसत आहे. त्याचवेळी एक नियंत्रण सुटलेली जेसीबी त्याच्या दिशेने वेगाने येताना दिसत आहे. जेसीबी दुचाकीस्वाराला धडकणार तितक्यात विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका महिंद्रा बोलोरोने जेसीबीला जोरदार धडक दिली. बोलेरोच्या या धडकेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहे. या धडकेत हा तरुणही किरकोळ जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ही दुर्घटना नेमकी कुठे घडली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या