Video – रेल्वे प्रवासात असा फोन मारला, मुंब्रा स्टेशनवर चोर पकडला

1467
cctv-footage-mumbra

सध्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून रेल्वे प्रवासात अनेकदा फोन चोरीला जातात. मुंब्रा रेल्वे स्थानकात रविवारी असाच प्रकार घडला. लोकल सुरू झाल्यानंतर मोबाईल चोराने प्रवाशाला धक्का देऊन धावत्या गाडीतून रेल्वे स्थानकात झेप घेतली आणि तो पळला. पण दक्ष प्रवासी आणि एका रेल्वे पोलिसामुळे त्याला पकडण्यात यश आले असून त्याचे सीसीटीव्ही फूटेज जारी करण्यात आले आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर रात्रीचे 12:10 मिनिटांची मुंबईच्या दिशेन जाणारी धीमी लोकल उभी राहिली. तेव्हा एक व्यक्ती कल्याणदिशेकडील डब्ब्याजवळ उभा होता. त्याच्या हालचाली हवालदार विवेक कटियार यांना संशयास्पद वाटल्या त्यामुळे ते त्याच्यावर नजर ठेवून होते. तो डब्ब्यात चढला आणि गाडी सुरू होताच दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाला जोरात धक्का देत त्याच्या हातातील मोबाईल घेऊन रेल्वे स्थानकात उडी मारली. पाठोपाठ प्रवाशाने देखील उडी मारून त्याचा पाठलाग सुरू केला. विवेक कटियार ही या दोघांच्या मागे पळाले. अखेर मुंब्रा स्थानकाच्या बॉम्बे कॉलनीकडील भागात हा चोर दोघांच्या हाती लागला. अफजल अख्तर शेख (वय – 21) असे या चोराचे नाव असून तो मुंब्र्यातच वास्तव्य करतो.

पाहा व्हिडीओ

प्रवासी उत्तम मनोहर जगदाळे यांनी तत्काळ मुब्र्यातील आरपीएफ ऑफिसमध्ये त्याविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर अफजल विरोधात भादंवि 392 अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या