व्हिडीओ बनवण्यासाठी युट्युबरने जाळली 1.25 कोटींची मर्सिडीज, पाहा व्हिडीओ…

सोशल मीडियावर आपला व्हिडीओ व्हायरल व्हावा म्हणून कोण कुठे कधी काय करेल याचा काहीही नेम नाही. अलीकडेच रशियन यूट्यूबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हा यूट्यूबर आपली 1.25 कोटीहून अधिक किंमत असलेली ‘मर्सिडीज’ जाळताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध यूट्यूबर मिखाईल लिटविन याने हा व्हिडीओ बनवला आहे. ज्यात त्याने आपली मर्सिडीज -एएमजी जी 63 कार जाळली आहे. ही कार फक्त 15 हजार किमी धावली होती. मिखाईलने गेल्या 10 महिन्यांत अनेकदा आपली कार दुरुस्त केली. मात्र वारंवार त्यात बिघाड येत होता. शेवटी वैतागून त्याने आपल्या कारवार पेट्रोल टाकून ती जाळली आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.

आपली सव्वा कोटींची कार जाळत असताना त्याच्या चेहऱ्यावर किंचित सुरकुती नव्हती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. मिखाईलच्या युट्युब चॅनलचे 50 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. अनेक नेटकरी त्याचा हा व्हिडीओ पाहून आपली प्रतिक्रिया देत आहेत. ज्यात अनेकांनी त्याने आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट केला असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या