Viral Video बिबट्याची सुटकेसाठी वनविभागाची शक्कल, खाटेच्या मदतीने काढले बाहेर

देऊळगाव राजा वन परिक्षेत्रातील खलियाल गावाजवळील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने सुटका केली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बिबट्याची सुटका करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि परिसरातील गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. बिबट्याची सुटका करण्यासाठी एक खाट दोऱ्यांच्या साहाय्याने विहिरीत सोडण्यात आली. ज्यावर बिबट्या उभा राहिला सोबत एक पिंजराही सोडण्यात आला. खाटेवरून बिबट्या पिंजऱ्यात शिरल्याबरोबर पिंजऱ्याचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर पिंजरा वर खेचून बिबट्याला वाचवण्यात आले.