विरारमध्ये खासगी शिकवणीत मुलीचा विनयभंग, शिक्षकाला भर रस्त्यात नागरीकांनी चोपले

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर खासगी क्लासेस मध्ये विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी चोप देत धिंड काढली आणि विरार पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. विरार पूर्वेच्या कारगील नगर येथे हा प्रकार घडला आहे .

पीडित मुलगी क्लासेसमध्ये असताना तिला येथील हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केला होता. मुलगी दोन दिवस क्लासेसला जात नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची खोदून चौकशी केली असता, तिने सर्व प्रकार सांगितला, स्थानिकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी शिक्षकाच्या तोंडाला काळ फासून चांगलाच चोप देत अर्धनग्न अवस्थेत भर विरार शहरात त्याची धिंड काढून विरार पोलिसांच्या स्वाधीन केले. विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकाराचा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.