विराट, अनुष्का बनले टूथसीचे ब्रँड ऍम्बेसेडर

देशातील आघाडीच्या स्माईल मेकओव्हर ब्रँड टूथसीने अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून घोषणा केली. यामुळे नवीन-युगातील दात सरळ करणाऱया क्लीअर अलाइनरचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. हे स्टार पॉवर कपल सर्व प्रमुख बाजारपेठांमधील ग्राहकांशी संपर्क निर्माण करण्यासाठी ब्रँडसोबत काम करणार आहे. कंपनी आधुनिक, तंत्रज्ञान-समर्थित सोल्यूशन ऑफर करते ज्यामुळे सहा ते आठ महिन्यांत दात सरळ करता येतात. याव्यतिरिक्त ग्राहक ब्रँडच्या ऍपद्वारे स्कॅन बुक करू शकतात, माहिती मिळवू शकतात आणि उपचारांच्या प्रगतीचे निरीक्षण करू शकतात. टूथसीचे सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्पी मेहता शाह यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.