विराटने केली गांगुलीच्या शतकांशी बरोबरी

45

सामना ऑनलाईन, हैद्राबाद

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बांग्लादेशविरूद्ध सुरू झालेल्या कसोटी सामन्यात शतक झळकावत सौरव गांगुलीच्या शतकांशी बरोबरी केली. गांगुलीने एकूण १६ शतके ठोकली होती, विराटने देखील हा पल्ला पार केला आहे. विराट अजूनही नाबाद असून त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.

हिंदुस्थानी संघाकडून सर्वात जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता विराट कोहली ८ व्या स्थानावर पोहोचला आहे. आजच्या शतकी खेळीमध्ये विराटने १२९ धावात १० चौकारांसह १०० धावा फटकावल्या. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराटने १११ धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने आजपर्यंत ज्या ज्यासंघांविरूद्ध सामना खेळला आहे, त्या सगळ्या संघाविरूद्ध त्याने शतकं ठोकली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध६ न्यूझीलंडविरूद्ध ३, इंग्लंडच्या विरोधात ३, दक्षिण अफ्रिका,श्रीलंका वेस्ट इंडीज आणि बांग्लादेशविरूद्ध प्रत्येकी एक शतक ठोकले आहे.

सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी

विराट कोहलीला या सामन्यामध्ये विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. एका मोसमात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. त्याने ४ शतकांच्या जोरावर ११०५ धावा फटकावल्या होत्या. तर कोहलीने देखील ४ शतकांच्या जोरावर आत्तापर्यंत १०७५ धावा केल्या आहेत. शुक्रवारचा दिवस सुरू होईल तेव्हा कोहली हा विक्रम मोडेल अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या