विराट सुस्साट, हिंदुस्थानने ओलांडला ६००चा टप्पा

49

सामना ऑनलाइन । हैदराबाद

हैदराबादमध्ये राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या हिंदुस्थान-बांगलादेश कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने ६०० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार विराट कोहलीने शानदार द्विशतक (२०४ धावा) झळकावले.

कोहलीने सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करुन कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावण्याचा मान त्याने पटकावला. याआधी डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) आणि राहुल द्रविड (हिंदुस्थान) यांनी सलग ३ कसोटी मालिकांमध्ये द्विशतक केले होते.

कोहलीने घरच्या मैदानात खेळताना एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने २०१६-१७ मध्ये १५ डावांत ११४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागने २००४-०५ मध्ये एका मोसमात १७ डावांत ११०५ धावा केल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या