IPL 2020 – विराटचे षटकारांचे द्विशतक, अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात सामना रंगला. चेन्नईने बंगळुरूचा 8 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूने विजयासाठी दिलेले 146 धावांचे आव्हान बंगळुरूने 18.4 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बंगळुरूचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहली याने खास टप्पा गाठला.

चेन्नई विरुद्ध विराट कफली याने 43 चेंडूत 50 धावांची अर्धशतकीय खेळी केली. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. रवींद्र जडेजा याच्या चेंडूवर 17 व्या षटकात षटकार ठोकत विराटने आयपीएल कारकिर्दीतील 200 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज आहे.

IPLमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

– ख्रिस गेल – 336*
– एबी डिव्हीलिअर्स – 231
– एम. एस. धोनी – 216*
– रोहित शर्मा – 209*
– विराट कोहली – 200*

आपली प्रतिक्रिया द्या