कोहली सोशल मीडियाचाही ‘किंग’, विराट फॉलोअर्स असणारा एकमेव क्रिकेटपटू

491

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवून दिली आहे. टी-20, एक दिवसीय आणि कसोटीमध्ये विराट कामगिरी करत कोहलीने क्रिकेटच्या दुनियेत मानाचे स्थान गाठले आहे. मैदानासह सोशल मीडियावरही कोहलीची जादू कायम आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा क्रिकेट खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे.

ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विराट कोहली सातत्याने काहीतरी पोस्ट करत असतो आणि चाहत्यांशी संवाद साधत असतो. या तिन्ही माध्यमांवर विराट कोहलीचे तीन-तीन कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा विराट पहिला क्रिकेटपटू आहे. दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. ट्विटरवर सचिनचे तीन कोटी, फेसबुकवर 2.8 कोटी आणि इन्स्टाग्रामवर 1.65 कोटी फॉलोअर्स आहेत.

विराट आणि सचिनच्या तुलनेमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसतो. तरीही तो यात तिसऱ्या स्थानावर असून इन्स्टाग्रामवर धोनीचे 1.54 कोटी, ट्विटवर 77 लाख आणि फेसबुकवर 2.05 कोटी फॉलोअर्स आहेत. रोहितही या रेसमध्ये असून तिन्ही ठिकाणी त्याला एक कोटींपेक्षा जास्त लोक फॉलोअर्स होते.


View this post on Instagram

Great win last night and top batting in both games by this dude

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

आपली प्रतिक्रिया द्या