टूर निघाली!

34

सामना प्रतिनिधी । मुंबई

जानेवारी महिना हा जगभरातील क्रिकेटशौकिनांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. हिंदुस्थानींच्या दक्षिण आफ्रिका दौऱयासोबतच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेला न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली यंदा हिंदुस्थानी संघ मैदानात उतरणार आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघासोबत पृथ्वी शॉचा १९ वर्षांखालील संघही न्यूझीलंडसाठी रवाना झाला. त्याआधी ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने १९ वर्षांखालील संघाची भेट घेऊन त्यांना विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या