अंपायरच्या दुर्लक्षामुळे तिसऱ्या कसोटीत हिंदुस्थानला ५ धावांचं नुकसान

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसीनं १ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या नव्या नियमांमध्ये एक फेक फिल्डिंगचा नियम होता. एखादा खेळाडू फेक फिल्डिंग करतांना आढल्यास नियमानुसार समोरील संघाला ५ धावा बहाल केल्या जातात. हिंदुस्थान-श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ‘फेक फिल्डिंग’ झाल्याचं पहायला मिळालं. श्रीलंकन संघाचा कर्णधार चंडीमलने फेक फिल्डिंग केल्याचं दिसून आलं. मात्र हा प्रकार पंच जोएल विल्सन यांच्या लक्षातच आला नाही.

सामन्याच्या ५३व्या ओव्हरचा चौथा बॉल भुवनेश्वर कुमारने बॅकफुटवर जात खेळला. हा बॉल पकडण्यासाठी श्रीलंकन कॅप्टन चंडीमल धावला आणि मग थ्रो करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातात बॉलच नव्हता. तरिही त्याने थ्रो केला. नव्या नियमानुसार हा प्रकार ‘फेक फिल्डिंग’मध्ये येतो. ही गोष्ट पंचांच्या निदर्शानास न आल्याने कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच नाराज झाला. काही वेळाने पंच जोएल विल्सन यांनी चंडीमलशी संवाद साधून त्याला समज दिली.

https://vimeo.com/243413730

आपली प्रतिक्रिया द्या