विराट-अनुष्का ‘इथे’ करणार नवीन वर्षाचं सेलिब्रेशन

21

सामना ऑनलाईन । डेहराडून

हिंदुस्थानी क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावर जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा मैदानाबाहेरही. अर्थात मैदानाबाहेर चर्चा होते ती विराट आणि त्याची गर्लफ्रेंड बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री अनुष्का शर्मा बद्दल. सध्या ते दोघे उत्तराखंडमध्ये एकत्र सुट्ट्या घालवत आहेत आणि त्यांचं नवीन वर्षाचं एकत्र सेलिब्रेशन देखील इथल्याच हॉटेलमध्ये होणार आहे.

विराट आणि अनुष्का दोघेही शनिवारी उत्तराखंडमधील नरेंद्रनगर येथे आनंदा हॉटेलमध्ये सात दिवस राहणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. त्यांनी ख्रिसमस जोरदार साजरा केला, पण थंडी प्रचंड असल्याने ते हॉटेलच्या बाहेर पडले नाहीत. पण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ते याच ठिकाणी राहणार असल्याचेही या वृत्तात म्हटलं आहे. हॉटेलमध्ये नववर्ष स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र हे सेलिब्रेशन कसं असेल? याची माहिती हॉटेलकडून गुप्त ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या