ना प्रियांका ना दीपिका; विराट सगळ्यात मोठा सेलिब्रिटी, इंस्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर

361
virat-kohli-whistle

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. विराटची लोकप्रियता इतकी आहे की, बॉलीवूडचे स्टार्स देखील त्याच्या मागे पडले आहेत. इंस्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स असणारा विराट हा एकमेव हिंदुस्थानी आहे.

एकाबाजूला विराट मैदानात नवनवे विक्रम रचत आहेच. तर मैदानाबाहेर देखील त्याचे वजन वाढले आहे. जाहिरात क्षेत्रात त्याने अन्य सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. सोशल मीडियावर देखील जगभरातील चाहते त्याला फॉलो करतात. 31 वर्षांचा हा क्रिकेटपटू काय पोस्ट करतो याकडे कोट्यवधी लोकांचं लक्ष लागलेलं असतं. इंस्टाग्रामवर त्याने आतापर्यंत 930 पोस्ट अपडेट केल्या असून त्याचे 5 कोटी फॉलोअर्स आहेत.

जगभरात इंस्टाग्राम अधिकृत अकाऊंट असलेल्या सेलिब्रिटींमध्ये पोर्तुगलचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 20 कोटी फॉलोअर्स आहेत.


View this post on Instagram

No Off switch included. #HybridOzone @pumaindia

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

हिंदुस्थानचा विचार केल्यास बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा दुसऱ्या तर दीपिका पडुकोण ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे अनुक्रमे 4.99 कोटी आणि 4.41 कोटी फॉलोअर्स आहेत.

कोहली लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीम इंडियाला त्याने उत्तमरित्या सांभाळले असून कसोटी क्रिकेटमध्ये देखील कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या