कोहलीचा ‘विराट’ पराक्रम, अझरुद्दीनचा विक्रम मोडला

1094

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात रांचीमध्ये तिसरी कसोटी सुरू आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून पाहुण्या आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’ देण्यापासून टीम इंडिया अवघ्या दोन विकेट्स दूर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेच्या 8 बाद 138 धावा झाल्या होत्या. सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून आफ्रिकेचा संघ अद्यापही 203 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.

#INDvSA आफ्रिकेचे लोटांगण, टीम इंडिया ‘व्हाईटवॉश’पासून 2 विकेट्स दूर

तत्पूर्वी टीम इंडियाने आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 162 धावांमध्ये गुंडाळला आणि 335 धावांची आघाडी घेतली. कर्णधार विराटने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीमध्ये विराटने आठव्यांदा विरोधी संघाला फॉलोऑन दिला. यासह हिंदुस्थानकडून सर्वाधिक वेळा फॉलोऑन देणारा कर्णधार म्हणून विराटच्या नावाची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या नावावर जमा होता.

टीम इंडियाकडून फॉलोऑनचा विक्रम करणारे 4 कर्णधार –

  • विराट कोहलीने 51 कसोटीमध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व करताना 8 वेळा विरोधी संघाला फॉलोऑन दिला आहे.
  • मोहम्मद अझरुद्दीनने 47 कसोटीत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना 7 वेळा विरोधी संघाला फॉलोऑन दिला होता.
  • महेंद्रसिंह धोनी याने 60 कसोटीमध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व करताना 5 वेळा विरोधी संघाला फॉलोऑन दिला होता.
  • सौरव गांगुली याने 49 कसोटीत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना 4 वेळा विरोधी संघाला फॉलोऑन दिला होता.
आपली प्रतिक्रिया द्या