व्हिडीओ : आयपीएलआधीच संघातील खेळाडूंसोबत नाचला विराट कोहली

19

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलच्या हंगामाला आता फक्त एकच दिवस बाकी राहिला आहे. मात्र आयपीएलआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघातील खेळाडूंसोबत म्हणजेच ब्रँडन मॅक्यूलम आणि युजवेंद्र चहल यांच्यासोबत डान्स केला आहे. यांच्या डान्सचा व्हिडीओ मंगळवारी युजवेंद्र चहल याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली, ब्रँडन मॅक्युलम, आणि युजवेंद्र चहल डान्स फ्लोअरवर काही स्टेप्स करताना दिसत आहेत. युजवेंद्र चहलने हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘वॉर्म अप विथ दिझ लिजंड’ असे लिहीले आहे.

आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. आयपीएलच्या मागील हंगामात विराट कोहली अतिशय चांगल्या फॉर्मात होता. त्या स्पर्धेत त्याने विक्रमी चार शतके झळकावली होती. मात्र, तरीही आरसीबीला स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नाही. कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो संघाला यंदाचे जेतेपद पटकावून देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या